अकोला पंचायत समितीत बदली,इच्छुक शाळेवर नियुक्ती मिळविण्यासाठी शिक्षकांची फिल्डिंग
अकोला : पंचायत समिती स्तरावरून शिक्षकांच्या बदलीचा घोडेबाजार सुरू झाला आहे. आज अकोला पंचायत समितीअंतर्गत येणार्या शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या केल्या जात आहेत. प्रशासकीय बदलीसाठी ६0 पेक्षा अधिक शिक्षक पात्र असून सुमारे ३0 शिक्षकांच्या विनंतीवरून
बदल्या गेल्या जातील.
शिक्षकांच्या प्रशासकीय बदलीला जिल्हा स्तरावर ब्रेक लागला आहे. आता शिक्षकांसोबत पदाधिकार्यांचे लक्ष पंचायत समिती स्तरावरून होणार्या बदल्यांकडे लागले आहे..शिक्षकांना प्रशासकीय बदलीमध्ये इच्छुक शाळेवर नियुक्ती मिळविण्यासाठी शिक्षकांनी फिल्डिंग लावली असून पदाधिकार्यांना त्यासाठी हाताशी धरण्यात येत आहे.
२0 ते २२ मे दरम्यान मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी आणि आकोट पंचायत समितीच्या बदल्या करण्यात आल्या.
आज २३ मे रोजी पातूर आणि अकोला पंचायत समितीअंतर्गत येणार्या शिक्षकांच्या बदल्या होणार आहे.
|