Addhar News Logo  
मुख्य पान   विशेष     पत्रकार संघ   स्वतंत्र विदर्भ राज्य   समाज प्रबोधन विकास संस्था   सेवा व सुविधा   थोडक्यात   संपर्क
आज दिवस भरात   महत्वाच्या लिंक   अकोला   कात्रण   Video Watch
/tr>
महामार्गाला एशियन महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. बडनेरापासून अकोला, बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यातील मोठी गावे वळणरस्त्याने दूर ठेवण्यात येत आहेत. बडनेरा ते धुळय़ापर्यंत एकूण २८0 किमीपर्यंत चौपदरीकरणासाठी (१८00 हेक्टर) साडेचार हजार एकर जमीन संपादित केली जात आहे. बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर चौपदरीकरण होत आहे. एल अँन्ड टी कंपनीसोबत करार झाला आहे. अमरावती विभागात बुलडाणा जिल्हय़ाची सीमा म्हणजे मलकापूरपर्यंत तीन टोल नाके प्रस्तावित आहेत. प्राथमिक माहितीनुसार प्रत्येक ६0 किमीच्या टप्प्यात एक याप्रमाणे काटेपूर्णा, शेगाव तालुक्यातील एक गाव, मलकापूर या ठिकाणी नाके असतील.


 
 
 
 
 
 

 

 

 

 

 

आधार अॅड अँड न्युज ब्यूरो अकोला


पाण्यासाठी हायवे थांबला ,बांधकामासाठी पाणी नाही

बडनेरा ते धुळ्यापर्यंत चौपदरीकरण

अकोला। दि. २८ (प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वारंवार ब्रेक लागत आहे. कामाला सुरुवात होण्याच्या तयारीत असताना बांधकामासाठी पाणीच नसल्याने विस्तारीकरणाचे काम थांबले आहे. काटेपूर्णातील अत्यल्प जलसाठा त्यासाठी कारणीभूत आहे. मात्र, जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने कामाला विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम आटोपले आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम महाराष्ट्रात नागपूर ते अमरावतीदरम्यान झाले आहे. त्यानंतर बडनेरा ते जळगाव (खां.) दरम्यानच्या दुसर्‍या टप्प्याचे काम होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे.
मात्र, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. रस्त्याची रुंदी वाढवताना पर्यावरणाला कोणते धोक संभवतात, याची खातरजमा करूनच मंत्रालय पुढील कामांना परवानगी देणार आहे. त्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे.
तसेच अमरावती, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. ज्या भागात जमीन संपादन झाले, तेथून कामाला सुरुवात करता येते. मात्र, बांधकामासाठी पाण्याची समस्या उभी ठाकली आहे. रस्त्याच्या कामासाठी लागणारे पाणी कोठून आणावे, असा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आहे.
काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १८ टक्के साठा आहे. तो पिण्यासाठीच पुरवावा लागणार आहे. बांधकामाला पाणी कोठून मिळेल, या समस्येवर उत्तर नसल्याने हायवेचे चौपदरीकरण थांबले आहे.