|
| आधार ऍड ऍण्ड न्युज ब्यूरो |
आता जिल्हा परिषदेतही सीबीएसई अभ्यासक्रम
|
|
|
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना दज्रेदार शिक्षण मिळावे यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार राज्याने आपला अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यानुसार पहिल्या वर्गाचा अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर राहणार आहे. यासाठी ३५0 शिक्षकांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने समांतर अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २00५ तयार करण्यात आला.
या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने राज्य अभ्यासक्रम आराखडा २0१0 तयार केला. हा आराखडा राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसारच आहे. यंदा पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून शिक्षण विभागाने त्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. पहिलीच्या अभ्यासक्रमातील बदलासंदर्भात प्रशिक्षण शिक्षकांना दिले जात आहे. ३५0 शिक्षकांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळ्यात या शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जात आहे.
अभ्यासक्रम पाठांतरावर नाही तर हसत खेळत शिकविला जाणार आहे. पहिल्याच्या अभ्यासक्रमात यावर्षी गीतही शिकविले जाणार आहे. यासोबतच १ ते १00अंकांची ओळख, ज्ञान रचनावाद, जीवन शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे.या नव्या अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांची घोकमपट्टी बंद होणार असून मुलांच्या स्वंअध्यनाला चालना मिळणार आहे. यातून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रीय पद्धतीच्या अभ्यासाचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे.
|