रिसोड विधानसभा मतदार संघातून जाणारा अकोला - वाशीम - नांदेड या राज्यमार्गाला केंद्र शासनाने नुकताच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला असून त्या बाबतची अधिसुचना नुकतीच जारी करण्यात आल्याचे माजी मंत्री तथा रिसोडचे आ. सुभाष झनक यांनी विश्रामगृहावर चर्चे दरम्यान सांगितले.
अकोला- वाशीम - नांदेड ते आंध्रप्रदेशाचे सिमेपर्यतचा हा रस्ता राज्यमार्ग म्हणून होता. या राज्यमार्गावरून हैद्राबाद, तिरूपती, श्रीसेलम व नांदडे ला जाणारी फार मोठय़ा प्रमाणात वाहतुक होती. वाढलेली वाहनांची वर्दळ यामुळे सदर रस्ता बर्याच प्रमाणात खराब झाला होता. त्यामुळे फार मोठय़ा अंतराच्या या रस्त्याचे दुरूस्ती व देखभालीसाठी निधी सुध्दा कमी पडत हेाता. मा. अशोकराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून कामकरित असतांना मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील काही प्रमुख राज्य मार्गाचा दर्जा राष्ट्रीय महामार्गात बदलकरण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याबाबत विषय आला होता. त्यावेही मी अकोला - वाशीम - नांदेड या रस्त्याच्या दर्जा राष्ट्रीय महामार्गात बदलण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती कारण त्यावेळी मी अकोला व नांदडे या दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामाकरित होती. त्यावेळी अकोला - नांदेड - आंध्रराज्य सिमेपर्यत, तुळजापुर, लातुर, नांदेउ, यवतमाळ, वर्धा, बुटीबोरी, रत्नागिरी, पाली, कोल्हापुर, सोलपुर, सिन्नर, शिर्डी, अहमदनगर या रस्त्यासह एकूण १२ राज्यमार्गाचा दर्जा राष्ट्रीय महामार्गात बदलण्याबाबत राज्यशासनाच्या शिफारसीसह प्रस्ताव केंद्र राज्यमार्गाचे रूपातंर राष्ट्रीय महामार्गात झाल्यामुळे रस्त्याचा रूंदीकरणासह विशेष दुरूस्ती तसेच मालेगाव व वाशीम च्या बायपासचे काम प्राधान्यतेने हाती घेता येईल व त्यासाठी केंद्र शासनाचा निधी उपलब्ध होणार असल्याचे झनक यांनी सांगितले. अकोला- वाशीम - नांदेड या नव्या राष्ट्रीय महामार्गाचा १६१ क्रमांक असून लांबी ३00 कि.मी. आहे. त्यामधील जवळपास ४0 कि.मी.ची लांबी रिसोड मतदार संघातील आहे. या नव्या राष्ट्रीय महामार्गास मान्यता मिळाल्यामुळे या रस्त्याच्या सुधारणेसाठी व रूंदीकरणासाठी चा प्रस्ताव प्राधान्यतेने तयार करण्याबाबत आ.झनक यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण नागपूर यांच्या सोबत चर्चा केली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे व या राष्ट्रीय महार्गावर मालेगाव व वाशीम ही प्रमुख शहर येत असल्यामुळे वाशीम जिल्ह्याचे औद्योगिक विकासाला निश्चितच गती मिळेल. असा आशावाद आ.सुभाष झनक यांनी व्यक्त केला.
|