Addhar News Logo  
मुख्य पान   विशेष     पत्रकार संघ   स्वतंत्र विदर्भ राज्य   समाज प्रबोधन विकास संस्था   सेवा व सुविधा   थोडक्यात   संपर्क
आज दिवस भरात   महत्वाच्या लिंक   अकोला   कात्रण   Video Watch


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आधार ऍड ऍण्ड न्युज ब्यूरो


अकोला तालुक्यातील गरीब कुटुंबातील वैशाख वाहुरवाघ बनला तहसीलदार


अकोला तालुक्यातील मुळ कानशिवणी गावचे हल्ली महात्मा फुले स्मशान भूमी जवळ सिंधी कॅम्प मध्ये राहणारे सर्वसामान्य मजूर कुटुंबातील वैशाख वाहुरवाघ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करून तहसीलदारपदी त्यांची निवड झाली. त्याने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीद्वारे कठीण परिस्थितीवर मात करत इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
वैशाखचे आई वडिल दोघेही मजूरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब कानशिवणी या गावी दहा बाय दहाचे कुडाची झोपडीमध्ये राहणारे कुटुंब कामाचे शोधात अकोल्यामध्ये आले. महात्मा फुले नगरात राहयाला लागले. वैशाख, बबन, कमल तिन्ही मुलासह मिळेल ते काम करणे, कधी शेतमजूरी करणे, तर कधी पाईपलाईन साठी खोदकाम करणे, कधी बांधकामावर काम करणे, अशा प्रकारे काम करीत असताना वैशाख अधिकारी होण्याचे स्वप्न सुद्धा बघत होता.
२000 मध्ये त्याचे डी. एड. पूर्ण झाल्यावर वाशिम जि. प. मध्ये सहा. शिक्षक पदावर रुजू झाल्यावर कुटुंब सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत गेला. २00९ साली न. प. मध्ये मुख्याधिकारी म्हणून निवड झाली पण फेरयादी ने घात केला व निवड रद्द झाली. पण त्यानंतर २0१२ मध्ये विक्रीकर निरीक्षक म्हणूनही निवड झालेली आहे. त्यावर वैशाखने न थांबता एम.पी.एस.सी ची तयारी सतत करीत होता. त्यामध्ये २0१३ मध्ये त्याची भेट तहसीलदारपदी निवड झाली. त्यांचे स्वप्न होते तहसीलदार होण्याचे ते पूर्ण झाले.
राज्याच्या रॅकींगमध्ये २६ व्या स्थानावर त्याची निवड झाली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानणार्‍या वैशाखच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या लहान भावाने आपली एल. एल. बी पूर्ण केल्यानंतर वकिलीची प्रॅक्टीस करीत असताना एम. पी. एस. सी. द्वारे आयोजित परीक्षेमध्ये शासकीय अभियोक्ता वर्ग १ अधिकारी म्हणून निवड झाली.
वैशाख वाहुरवाघ व मिलींद दारोकार हे रोज सकाळी ९ वाजता बोरगांव मंजू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका जि.प.शाळा क्र.२ येथे मोफत मार्गदर्शन करीत असतात. परिसरातील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका बोरगांव मंजू यांनी केले आहे.