Addhar News Logo  
मुख्य पान   विशेष     पत्रकार संघ   स्वतंत्र विदर्भ राज्य   समाज प्रबोधन विकास संस्था   सेवा व सुविधा   थोडक्यात   संपर्क
/tr>
 
 
 
 
 
 
 
आधार ऍड ऍण्ड न्युज ब्यूरो

 


सर्वसामान्यांनी जायचे कुणाकडे? ..........हायकोर्टाने 'खाकी'ला फटकारले

 

मुंबई : आरोपीशी हातमिळवणी करून एकाच घटनेत दोन एफआयआर नोंदवून फिर्यादीलाच गुंतवणार्‍या पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. पोलिसांनी अशा प्रकारे कार्यतत्परता दाखवून आरोपीलाच फायदा होईल अशा प्रकारे भूमिका घेतली तर सर्वसामान्य व्यक्ती कोणाकडे जाईल, असा नाराजीदर्शक सवाल न्यायालयाने उपस्थित केला. पोलिसांनी गुन्हा आणि गुन्ह्याचे स्वरूप न पाहता आरोपीला त्याचा फायदा मिळेल, अशाच प्रकारे कायद्याचा गैरवापर केला आहे, असे मत व्यक्त करून फिर्यादी मोहम्मद सादिक फकीर मोहम्मद खान आणि मोहम्मद यासीन फकीर खानविरोधात दाखल केलेला खटला रद्द केला.

एकाच घटनेत आंबोली पोलिसांनी आरोपी झहीरउद्दीन काझीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्याबरोबर हातमिळवणी केली. पोलिसांनी आरोपीच्या तक्रारीवरून फिर्यादी मोहम्मद सादिक फकीर मोहम्मद खान आणि मोहम्मद यासीन फकीर खानविरोधात सहा महिन्यांनंतर ३0७ चा गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केल्याने खटला रद्द करावा म्हणून याचिकाकर्त्यांच्या वतीने अ?ॅड़ गणेश गाळे यांनी याचिका दाखल केली. त्या याचिकेवर नुकतीच न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एस. एस. जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने पोलिसांच्या कार्यतत्परतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास विलंब का झाला? तसेच सहा महिन्यांनंतर आरोपीने दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन फिर्यादीविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस त्यांच्याविरोधात तातडीने कसे काय आरोपपत्र दाखल करू शकतात? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. पोलिसांनी कायद्याचा अशा प्रकारे गैरवापर केला तर सर्वसामान्य व्यक्तीने कोणाकडे दाद मागावी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. फिर्यादीविरोधात आरोपपत्र दाखल केले असले तरी कनिष्ठ न्यायालयाने आरोपपत्र निश्‍चित करू नये, असा आदेश दिला. तसेच हा गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात नव्याने याचिका दाखल करण्याची मुभा दिली. त्यानुसार फिर्यादीने केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने मोहम्मद सादिक फकीर मोहम्मद खान आणि मोहम्मद यासीन फकीर खान यांच्याविरोधातील खटलाच रद्द केला.