अकोला। दि. २८
उन्हाळी सुट्टय़ा लक्षात घेता मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वेने विविध लोहमार्गांवर समर स्पेशल रेल्वेगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यादरम्यान इंदोर-यशवंतपूर आणि यशवंतपूर-इंदोर रेल्वेगाडी प्रायोगिक तत्वावर चालविण्यात येत आहे. सोमवारी 0९३0७ इंदोर-यशवंतपूर गाडीची शेवटची फेरी राहणार आहे आणि परतीच्या मार्गात 0९३0८ यशवंतपूर-इंदोर गाडीची शेवटची फेरी १ मे रोजी राहणार आहे.
समर स्पेशल रेल्वे गाड्यांमध्ये बिलासपूर-पुणे, चेन्नई-बिकानेर, शालीमार-एलटीटी (अतिरिक्त), नागपूर-पुणे, पुरी-शिर्डी आणि नागपूर-सीएसटीचा समावेश आहे. रेल्वेगाडी 0८२९५ बिलासपूर-पुणे प्रत्येक सोमवारी मध्यरात्री 00.३३ वाजता अकोल्यात पोहोचून पुण्यासाठी रवाना होईल. ही रेल्वेगाडी १३ मे पर्यंत उपलब्ध राहणार आहे. यासोबतच 0६0१३ चेन्नई-बिकानेर मंगळवारी सकाळी १0.४५ वाजता अकोल्यात पोहोचून बिकानेरसाठी रवाना होईल. ही रेल्वेगाडी ११ जूनपर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक 0८0६0 शालीमार-एलटीटी (अतिरिक्त) प्रत्येक गुरुवारी४ वाजता पोहोचून एलटीटीसाठी रवाना होणार आहे. ही गाडी ९ मेपर्यंत चालणार आहे. नागपूर ते पुणे आणि सीएसटीदरम्यान दोन अतिरिक्त रेल्वेगाड्या धावत आहेत. 0१0२९ नागपूर-पुणेही रेल्वेगाडी आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी अकोल्यात दुपारी २.४५ वाजता येऊन पुण्यासाठी रवाना होईल. ही गाडी २८ जूनपर्यंत धावणार आहेत. तसेच २३ जूनपर्यंत गाडी क्रमांक 0१0१४ नागपूर-सीएसटीदरम्यान धावणार आहे. ही रेल्वेगाडी अकोल्यात प्रत्येक रविवारी रात्री ८.४0 वाजता येणार आहे.
0२७४६ पुरी-शिर्डी आठवड्यातून प्रत्येक रविवारी 00.0७ वाजता अकोल्यात येईल. ही गाडी १२ मे पर्यंत धावेल. परतीच्या प्रवासात 0८२९६ पुणे-बिलासपूर २ जुलैपर्यंत उपलब्ध राहणार आहे. ही गाडी आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी दुपारी १.२0 वाजता अकोल्यात येणार आहे.
0८0५९ एलटीटी-शालीमार ५ मे पर्यंत उपलब्ध राहणार आहेत. आठवड्यातून ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी ९.२५ वाजता अकोल्यात पोहोचेल. 0६0१४ बिकानेर-मद्रास प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ५.५५ वाजता अकोल्यात येईल. ही गाडी १४ जूनपर्यंत उपलब्ध राहील. 0१0३0 पुणे-नागपूर आठवड्यातून प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५ वाजता अकोल्यात येईल. ही गाडी २९ जूनपर्यंंत धावेले 0२७४५ शिर्डी-पुरी ३0 जूनपर्यंत धावेल. ही गाडी अकोल्यात प्रत्येक रविवारी रात्री ८.३0 वाजता येईल.
|