आधार न्युज वर इंटरनेट द्वारे मोबाईलवर दिसणार अकोला जिल्हयातील घडामोडी
अकोला - विश्वाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत माहितचे सहज व गतीने प्रसारण शक्य व्हावे म्हणून प्रसिध्दी माध्यमामध्ये आता तिसरा मार्ग खुला झाला असून प्रिंट मिडिया व इलेक्ट्रानिक मिडिया सोबतच आता इंटरनेट मिडिया समोर आला आहे.
अकोला जिल्हयातील घडामोडी वृत्त आणि ज्ञान वाहिनी म्हणून आता आधार न्युज वर इंटरनेटच्या माध्यमातुन आपल्या संगणकाच्या स्क्रिनवर आणि मोबाईलवर सुध्दा पाहावयास मिळणार आहेत.
अकोला जिल्हयातील घडामोडी जनतेपर्यत पोहचाव्या म्हणुन मिडिया नेहमीच प्रयत्न करते त्यातुनच नभोवानी, दूरचित्रवाणी आणि मुद्रित माध्यम या तिन्हीचा संगम म्हणुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अकोला जिल्हातील लोकांच्या माहितीविषक
गरजा पूर्ण करण्यासोबतच नवे नेतृत्व विकसित करतांना सेवांचे आदान प्रदान याकामी उपयुक्त माध्यम म्हणून इंटरनेट न्यूज चॅनल सुरू करण्यात येत आहे.
ज्ञानक्रांतीला समर्थपणे सामोरे जाणारे इंटरनेट हे 21 व्या श्शतकातील मानवी जीवनाला कलाटणी देणारे प्रभावशाली माध्यम आहे. इंटरनेट हे जगभर परस्परांना जोडण्यारे बहूविध पर्यायांवर संदेश वाहनाचे साधन झाले आहे.
आजचे युग झटपट, फेसबुक आणि व्टिटरचे आहे. बदलत्या परिस्थितीत ऑनलाईन ,वेब पत्रकारितेने नव्या क्षितिजांचा श्शोध घेतला आहे.संगणक - मोबाईल व दळणवळण क्षेत्रातील विकसीत तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हयातील माहिती कोणत्याही
नागरिकाला जगाच्या कोणत्याही ठिकाणी मिळविता येते. इंटरनेटचा वापर करून विविध महत्वांच्या लिंकद्वारे मानवी जीवनात विकासात्मक क्रांती, लोककल्याणासाठी समाजहिताच्या दृष्टीने लोकहितकारक प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्याचे कर्तव्य आधार न्युजच्या माध्यमातुन होणार आहे.
प्रत्येकाला आपल्या जिल्हयामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये आणि जन्मस्थळ असलेल्यानंना गावी काय चालते आहे हे जाणुन घेण्याची उत्सुकता असते. ही अडचण दुर करण्यासाठी जगात कोठेही वाचता- पाहता येण्यासाठी च्या माध्यमातुन आधार न्यूज
ही सुविधा कार्यान्वीत करीत आहेत. या माध्यमाद्वारे आपणाला कोणत्याही इंटरनेट सुविधा असलेल्या मोबाईल - संगणकामध्ये कोणतेही शुल्क न भरता मोफत आणि सहज लाभ घेता येईल. जिल्हयाची गरज ओळखून मोबाईलवर ताज्या बातम्या, एस.एम.एस च्या
माध्यमातुन पाठविण्यात येणार अहोत. जिल्हयातील माहिती - बातम्या सात समुद्रापार जाणार शिवाय ही वेबसाईट क्षणाक्षणाला अपडेट करण्यात येत असल्याने याचा लाभ प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यत पोहचण्यासाठी आता इंटरनेट
द्वारे मोबाईलवर आपल्याला जिल्हयातील घडामोडी पहावयास मिळतील.
अकोला जिल्हात 31 हजार गरीब कुटूबांचे जीवन अंधकारमय